Shivsena : शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन

Shivsena : शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन

0
Shivsena : शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन
Shivsena : शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम आंदोलन

Shivsena : नगर : कुकडी साखर कारखान्याकडील (KUKADI SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD.) थकीत रक्कम व योग्य ऊसदराच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (Shivsena) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी (Sugarcane Farmers) मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची सुरुवात स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी शिवसेनेचे अभिजीत पोटे, महादेव आव्हाड, संजय वाघ, सोमनाथ गर्जे, युसुफ पठाण, बाळासाहेब कदम, कृष्णा सातपुते, सोपान चावरे, सचिन लांबे, संदीप धाडगे, अशोक हसुळे, सुनील कर्डिले, गणेश शेलार, अमोल तांबे, राहुल फुंदे, गणेश सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे आरोप (Shivsena)

जिल्ह्यात खासगी व सहकारी अशा अनेक साखर कारखान्यांचे जाळे असून, बहुतांश कारखानदार विविध राजकीय पक्षांशी संलग्न आहेत. या सर्वांनी संघटितपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे आरोप करण्यात आले. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर न करणे, निसर्गातील अडचणी व पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीत टाकणे, तसेच घोषणांप्रमाणे भाव न देणे, असे अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले.


कुकडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ७११ रुपये प्रति टन थकीत पैसे तत्काळ बँक खात्यात जमा करावेत, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच ३ हजार ५५० रुपये प्रति टन हमीभाव कोणतीही कपात न करता देणे, मागील हंगामातील तुटलेल्या उसाचे आर एस एफ प्रमाणे करणे, साखरेचा उतारा योग्य पद्धतीने दाखवणे, वजन काटे व सॉफ्टवेअरमधील फेरफार थांबवणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच वजन काट्यावर फेरफार करणाऱ्या व ऑडिटमध्ये अनियमितता करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांनी मुक्काम आंदोलनात सहभागी व्हावे : अभिजित पोटे
कुकडी साखर कारखान्याकडील ७११ रुपये प्रति टन थकबाकी तात्काळ देण्यात यावी, अशी होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मुक्काम आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे अभिजीत पोटे यांनी केले आहे.