
Centre clears leopard sterilisation plan : नगर : मानव-बिबट संघर्ष (Human-Leopard Conflict) कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तत्काळ सादर करावी, तसेच कृत्रीम बुद्धीमत्ता (एआय) (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात, बिबट नसबंदी बाबत केंद्राची मान्यता प्राप्त (Centre clears leopard sterilisation plan) झाली असून त्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहेत.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
मानव-बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत पुणे येथे बैठक
वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या सभागृहात मानव-बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, नाशिक मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन, आशिष ठाकरे,महादेव मोहिते, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, अहिल्यानगर उपवनसंरक्षक धर्मवीर सालचिठठल, विवेक होशिंग, कुलराज सिंह, सिध्देश सावडेकर, उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण यांच्यासह वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री नाईक यांनी नाशिक मधील वनकर्मचारी यांच्यावर झालेल्या बिबट हल्लाप्रकरणी संबंधित वनकर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
आवश्यक ते सर्व साहित्य पुरविणार (Centre clears leopard sterilisation plan)
मानव-बिबट संघर्षाबाबत वनकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य पुरविण्यात यावे. जिल्हा योजनेमधून आकस्मिक निधी त्वरीत उपलब्ध करुन देण्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत आहे. बांबू लागवड करुन बिबटला अटकाव करता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा, अशा सूचना नाईक यांनी दिल्या.
खांडेकर यांनी बैठकीत ऊस शेती, बिबट अधिवास व त्याकरीता प्रभावी उपाययोजनांबाबत माहिती दिली. यामध्ये साखर कारखान्यांनी करावयाची कार्यवाही, टायगर फाऊंडेशनवर आधारित नियोजन तसेच बिबट्यांची गणना करणे, बिबट्यांचे मायक्रोमॅपिंग, पोल्ट्री वेस्ट तसेच हॉटेल वेस्टची विल्हेवाट, रेस्क्यू सदस्यांचा विमा काढणे, बेस कॅम्पचे सक्षमीकरण करणे, कुरण विकास करून बिबट्यांकरीता अधिवास तयार करणे, मेंढपाळ, ऊस कामगार आदीकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.


