Jainism : जैन धर्माची शिकवण, संस्कार नव्या पिढीला मिळणे आवश्यक : अतुल शिंगवी

Jainism : जैन धर्माची शिकवण, संस्कार नव्या पिढीला मिळणे आवश्यक : अतुल शिंगवी

0
Jainism : जैन धर्माची शिकवण, संस्कार नव्या पिढीला मिळणे आवश्यक : अतुल शिंगवी
Jainism : जैन धर्माची शिकवण, संस्कार नव्या पिढीला मिळणे आवश्यक : अतुल शिंगवी

Jainism : नगर : लहान मुलं ही छोटेसे बीज असतात. या वयात त्यांना योग्य संस्कार व शिकवण मिळाल्यास ते उद्याचे सर्वगुणसंपन्न आदर्श नागरिक (Ideal Citizen) होतील. यासाठी जैन धर्माची (Jainism) शिकवण व संस्कार नव्या पिढीला मिळणे आवश्यक आहे. केडगावच्या जैन स्थानकात श्री आलोकऋषी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच दिव्य दर्शना महाराज व पुनीत दर्शना महाराज यांच्या सानिध्यात ‘आनंद जैन पाठशाळा’ सुरु केली आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे वर्धमान श्रावक संघाचे (Vardhamana Shravaka Sangh) अध्यक्ष अतुल शिंगवी यांनी सांगितले.

अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

जैन स्थानकमध्ये ‘आनंद जैन पाठशाळा’ सुरु (Jainism)

महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषी महाराजांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून केडगावच्या जैन स्थानकमध्ये ‘आनंद जैन पाठशाळा’ सुरु करण्यात आली आहे. या पाठशाळेत जैन समाजातील मुलामुलींना जैन धर्माची शिकवण, संस्कार दिले जाणार आहेत. यासाठी मेघा बोरा व शिल्पा राठोड़ या मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रकाश मालू, सम्रट बारमेचा, कोमल चोरडिया यांनी विचार मांडले. उपाध्यक्ष मयूर चोरडिया, वर्धमान श्रावक संघाचे सह सचिव ललित गूगळे, अमित चोरड़िया, परेश बलदोटा, उमेश बलदोटा, पवन मूथीयान, कमलेश पोखरणा, दर्शन गांधी, आनंद ओस्तवाल यांच्यासह पाठशाळेच्या शिक्षिका अश्विनी मुनोत, मयुरी बाफना, मनीषा शिगंवी, कोमल चोरडिया, मीना बोरा व  गुरुदेव महिला मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.