
Shrirampur Municipal Council Elections : श्रीरामपूर : नगरपरिषद निवडणुकीतील (Shrirampur Municipal Council Elections) नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अखेर संपला असून काँग्रेसच्या करण ससाणे (Karan Sasane) यांच्या विरोधात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने (BJP-NCP Congress Alliance) माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांना रिंगणात उतरवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून प्रकाश चित्ते हे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अशोक थोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे.
अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक
शिवसेना शिंदे गटाची महायुतीपासून फारकत
नगरपालिका निवडणुकीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीची आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी औपचारिक घोषणा करण्यात आली. यात भाजप २२ तर राष्ट्रवादी १२ नगरसेवक पदावर निवडणूक लढणार आहे. शिवसेना शिंदे गटाने अखेर महायुतीपासून पूर्णपणे फारकत घेतली आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, भाजप, ठाकरे गट, शिंदे सेना यांच्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष व बसपाही निवडणूकीच्या रणांगणात उतरले आहेत.
नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार
शिंदे सेनेकडून सर्व जागांवर उमेदवार (Shrirampur Municipal Council Elections)
शिंदे सेनेकडून इतर पक्षात उमेदवारी न मिळालेल्यांना शेवटच्या क्षणी आपल्या पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आल्याने त्यांनी सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. काँग्रेसकडून ससाणे गटाने सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारीची यादी अंतिम केलेली असल्याने त्यांची मोर्चेबांधणी आधीच पूर्ण होती. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युतीचा ‘फॉर्म्युला’ उशिरा ठरल्याने अनेक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. भाजपने राष्ट्रवादीला १२ जागा दिल्या. माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रभाग ३ मधून नगरसेवक पदासाठी अर्ज भरला आहे. शिंदे सेनेकडून प्रकाश चित्ते आणि दिपाली चित्ते यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सून मंजूश्री मुरकुटे (प्रभाग ११) यांच्यासह सागर बेग यांच्या समर्थकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.


