नगर: ‘इथं फक्त एकच जात अन् एकच धर्म – मानवतेचा’ म्हणत बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Bollywood actress Aishwarya Rai) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच(PM Narendra Modi) धर्माची व्याख्या सांगत सर्वांचं मन जिंकल आहे. ऐश्वर्या नुकतीच दिवंगत आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या शताब्दी उत्सवात सहभागी झाली. या सोहळ्यात ऐश्वर्या स्टेजवर जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली आणि त्यानंतर तिने हे वक्तव्य केले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यावर अनेकजण प्रतिक्रिया देत असून अनेकांनी ऐश्वर्याच्या धाडसाचे कौतूक केले आहे.
नक्की वाचा: राज्यात थंडीची हुडहुडी वाढली; हवामान विभागाचा अंदाज काय?
ऐश्वर्या नेमकं काय म्हणाली ? (Aishwarya Rai)
ऐश्वर्या रायने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत धर्म, जात आणि मानवतेवर प्रभावी आणि हृदयस्पर्शी भाषण दिले. ती आपल्या भाषणात म्हणाली, “इथं फक्त एकच जात आहे , मानवतेची जात. एकच धर्म आहे, प्रेमाचा धर्म. एकच भाषा आहे, हृदयाची भाषा. आणि एकच ईश्वर आहे, जो सर्वव्यापी आहे. साईराम, जय हिंद ” एवढं बोलून ऐश्वर्या थांबली. तिच्या या विचारांवर पंतप्रधान मोदींनीही टाळ्या वाजवल्या आहेत. या कार्यक्रमात ऐश्वर्याने शांतता, मैत्री आणि सार्वत्रिक प्रेम या मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले.
अवश्य वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
ऐश्वर्याचे सर्व स्तरातून कौतुक (Aishwarya Rai)
ऐश्वर्या राय आणि सत्य साईबाबा यांच्यातील जुना संबंधही सर्वपरिचित आहे. ऐश्वर्याचे पालक सत्य साईबाबा यांचे निष्ठावान भक्त होते. स्वतः ऐश्वर्याही सत्य साईबाबा यांच्या शाळेत शिक्षण घेतलं असून त्यांनी बालविकास आणि धर्मशास्त्राशी संबंधित उपक्रमांमध्येही सहभाग घेतला होता. 1994 मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतरही त्या विशेषतः पुट्टपर्थीला जाऊन सत्य साईं बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती. या सर्व पार्श्वभूमीमुळेच शताब्दी सोहळ्यातील तिची उपस्थिती आणि भाषण अधिक अर्थपूर्ण ठरलं आहे.



