Malegaon Rape and Murder Case : कोपरगाव: मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या (Malegaon Rape and Murder Case) केलेल्या घटनेचा कोपरगाव सकल सुवर्णकार समाजच्या (Kopargaon Sakal Suvarnakar Samaj) वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक
सर्वत्र संतापाची लाट
एका नराधम तरुणाने साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सदर घटनेतील नराधमाला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी, याकरिता या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याला सर्वांसमोर फाशी द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे कोपरगाव सकल सुवर्णकार समाजच्या वतीने करण्यात आली. सदरचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी स्वीकारले.
नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार
व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा केला निषेध (Malegaon Rape and Murder Case)
यावेळी कोपरगावातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,नगरसेवक अतुल काले,अनिल जाधव , प्रकाश भडकवाडे, अविनाश बागुल, महेंद्र कुलकर्णी, कैलास नागरे,दिनेश देवळालीकर,राहुल बागुल , हस्तशिल्प सुवर्णकारागीर वेल्फेअर असोसिएशन संस्था अध्यक्ष दिपक भालेराव, कोपरगाव सराफ असोसिएशन अध्यक्ष अनिकेत भडकवाडे, नंदकुमार जाधव, अविनाश वाघ, राजेंद्र वाघ, सुवर्णकार भारती सेवा संस्थान जिल्हाध्यक्ष संजय खरोटे,गणेश विसपुते ,दिनेश वर्मा,अक्षय वर्मा अनिल दाभाडे, कृष्णा विसपुते आदी उपस्थित होते.



