
Rape and Murder Case of Three-Year-Old Girl : नगर: मालेगाव (Malegaon Rape Case) तालुक्यातील घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या (Rape and Murder Case of Three-Year-Old Girl) करणाऱ्या आरोपीला सर्वांसमोर फाशी द्या (Death Penalty), अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे. त्या नराधम आरोपी विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून जिल्ह्यात ठिकठिकाणी त्या आरोपीचे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
संग्राम जगताप यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नराधम आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे लहान मुलीच्या हाताने दहन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव, माजी नगरसेवक नितीन शेलार, धनंजय जाधव, अंजली आव्हाड, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, विनय वाखुरे, मनेष साठे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप
सुवर्णकार संघटनेतर्फेही फाशीची मागणी (Rape and Murder Case of Three-Year-Old Girl)
राहुरी तालुका युवा सराफ सुवर्णकार संघटनेतर्फे तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले. राहुरीत निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून तात्काळ न्याय, तपासात पूर्ण पारदर्शकता, तसेच दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

कोपरगावात घटनेचा निषेध (Rape and Murder Case of Three-Year-Old Girl)
सदर घटनेतील नराधमाला तत्काळ कठोर शिक्षा व्हावी, याकरिता या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याला सर्वांसमोर फाशी द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे कोपरगाव सकल सुवर्णकार समाजच्या वतीने करण्यात आली. सदरचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी स्वीकारले. यावेळी कोपरगावातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. अशा विकृत मनोवृत्ती ठेचून काढण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी जिल्हाभरातून होत आहे. तसेच अशा घटना टाळण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची मागणीही होत आहे.



