
Economic Offenses Wing : नगर : जिल्हा रुग्णालयातील (Civil District Hospital) जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वैश्विक दिव्यंगत्व प्रणालीचा आयडी व पासवर्ड चोरी करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र (Fake Disability Certificate) तयार करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Economic Offenses Wing) जेरबंद केली आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
९ आरोपी निष्पन्न, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
अहिल्यानगर येथून एकूण १४२ दिव्यांग प्रमाणपत्रे हे डबल जावक क्रमांक नोंदवुन संशयास्पद रित्या देण्यात आले असल्याचे तपासात पुढे आले आहे. आज अखेर तपासात ९ आरोपी निष्पन्न झाले असून पुढील तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
१४२ दिव्यांग प्रमाणपत्रे संशयास्पद (Economic Offenses Wing)
नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप
पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश जाधव हे तपास करत आहेत. या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात जिल्हा रुग्णालयातून एकूण १४२ दिव्यांग प्रमाणपत्रे हे डबल जावक क्रमांक नोंदवून संशयास्पद रित्या देण्यात आले तपासात म्हटले आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना १४२ प्रकरणांची माहिती तत्काळ सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.


