Abhishek Kalamkar : नगर : महापालिका निवडणूक (Municipal Elections) ही स्थानिक प्रश्नांवर लढविली जाणारी निवडणूक आहे. नागरिकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवू शकणाऱ्या उमेदवारांनाच संधी दिली जाईल. १७ प्रभागांमध्ये महाविकास आघाडी व अन्य मित्रपक्षांसोबत निवडणूक लढविण्याचा विचार आहे. वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही पूर्णतः तयार आहे. विधानसभेत पक्षासोबत निष्ठा ठेवून काम करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य संधी दिली जाईल. लवकरच पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या उपस्थितीत सविस्तर रणनीती बैठकीचे आयोजन केले जाईल, असे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल
राष्ट्रवादी विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन
राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष निलेश मालपाणी, महिला शहराध्यक्षा नलिनी गायकवाड, कार्याध्यक्ष नामदेव पवार, संजय झिंजे, अनिकेत कराळे, चंद्रकांत उजागरे, सचिन नवगिरे, प्रकाश पोटे, नीता बर्वे, अॅड. शितोळे, फारूक रंगरेज, खुशी जाधव, रोहन शेलार, अक्षय भगत, दीपक सुडके, अभिषेक जगताप, नूर पठाण, समीर पठाण, फराज पठाण, प्रशांत दरेकर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप
यावेळी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर म्हणाले, (Abhishek Kalamkar)
विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांची झालेली उत्स्फूर्त उपस्थिती पाहून पक्षाची ताकद पुन्हा स्पष्ट झाली. आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणार आहोत. महाविकास आघाडीसोबत लढण्याचा विचार असून, गरज पडल्यास स्वबळावरही आम्ही सक्षम आहोत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधीत्व मिळेल याची हमी त्यांनी दिली. बैठकीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शविली.
राष्ट्रवादीच्या विजय संकल्प मेळाव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीचा ताप वाढला असून पक्ष आता सक्रिय तयारीसह रणनिती अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे.



