नगर: पुणे – माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) मोठी दुर्घटना घडली आहे. या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू (Six youths died) झाला असून ते तरुण पुण्यातील रहिवासी आहेत. पुण्यातील खडकवासला–उत्तम नगर येथील सहा पर्यटक मध्यरात्री कोकण पर्यटनासाठी काल रात्री निघाले होते, त्यावेळी हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे.
नक्की वाचा: मै सत्यनिष्ठा से…बिहारच्या मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा नितीश कुमार
नेमकं काय घडलं ? (Tamhini Ghat Car Accident)

रायगडच्या माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाटात काल (ता.१९) रात्री थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळली. या थार कारमधील सहाही तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी (ता. १८) या तरुणांचे फोन लागत नव्हते. त्यानंतर या तरुणांचा शोध सुरु झाला. या तरुणाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात आढळल्याने ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या तरुणांचा शोध घेण्यास आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. घटनास्थळी माणगाव पोलीस, SVRSS, शेलार मामा रेस्क्यू टीम आणि RESQ रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली उतरून तरुणांचा शोध सुरू केला.
अवश्य वाचा: राज्यात थंडीची हुडहुडी वाढली; हवामान विभागाचा अंदाज काय?
ताम्हिणी घाटात ही थार गाडी दरीत कोसळल्याचा कोणालाही माहित नव्हते. कठडा तुठल्याचे कळल्यानंतर येथे अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले. पुण्यातील हे तरुण सोमवारी(ता. १७) रात्री थार कारने कोकणात फिरायला निघाले होते. परंतू त्यांच्याशी मोबाईलशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या शोध सुरु करण्यात आला. रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यात सहाही तरुणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व मृत झालेले तरुण हे २२ ते २५ वर्ष वयोगटातील आहेत.
मृत तरुणांमध्ये कोणाचा समावेश ? (Tamhini Ghat Car Accident)

अपघातातील सर्व तरुण हे पुण्याच्या उत्तमनगर येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. साहील साधू गोटे (२४), शिवा अरुण माने (१९), ओंकार सुनील कोळी (१८), महादेव कोळी (१८), प्रथम रावजी चव्हाण (२४), पुनीत सुधाकर शेट्टी (२०) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.



