Sand Smuggling : वाळू तस्करी करणारी टोळी एका वर्षांकरिता हद्दपार

Sand Smuggling : वाळू तस्करी करणारी टोळी एका वर्षांकरिता हद्दपार

0
Sand Smuggling : वाळू तस्करी करणारी टोळी एका वर्षांकरिता हद्दपार
Sand Smuggling : वाळू तस्करी करणारी टोळी एका वर्षांकरिता हद्दपार

Sand Smuggling : नगर : राहुरी तालुक्यात दहशत करून अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणारी टोळी एक वर्षा करिता हद्दपार करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले आहे. या टोळी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) मारहाण करणे, महिलांना छेडणे, तसेच अवैध वाळू वाहतूक करणे, असे गुन्हा दाखल आहेत.

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल

१ वर्षाकरीता हद्दपार केलेल्यांची नावे

दीपक बबन लाटे (वय ३६, रा. चिचोली ता. राहुरी), निखील बबन लाटे (वय ३४), शहादेव विठ्ठल माने (वय ३४, रा. लेंडी तलाव, मेहकर, जि. बुलढाणा), अभिषेक राजेंद्र नाचणे (वय ३२ रा. नवले बस्ती, बेलापूर, ता. राहुरी) असे अहिल्यानगर जिल्ह्यातून १ वर्षाकरीता हद्दपार केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप

संघटीतपणे गुन्हे करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी हद्दपार (Sand Smuggling)

राहुरी तालुक्यात संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गोवंशीय कायदयान्वये, भारतीय हत्यार कायदयान्वये तसेच वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार टोळीची माहिती संकलन करून पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी या टोळीला एका वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.