AMC | अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध; जाणून घ्या तुमच्या प्रभागातील मतदार संख्या

0
AMC
AMC

AMC | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीनुसार काल (ता. २०) प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदारयादी नागरिकांना माहितीसाठी मुख्य प्रशासकीय कार्यालय व महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर महापालिकेचे (AMC) संकेतस्थळ www.amc.gov.in येथे फोटो विरहित मतदार यादी निःशुल्क पहाणेसाठी उपलब्ध आहे. 

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल

प्रारुप मतदारयादी इथे पाहता येणार (AMC)

या मतदार यादीबाबत हरकती / सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात २७ नोव्हेंबर अखेर कार्यालयीन वेळेत अहिल्यानगर महापालिका मुख्य कार्यालय (नवीन प्रशासकीय इमारत), प्रभाग समिती कार्यालय क्र. १ सावेडी, प्रभाग समिती कार्यालय क्र. २ शहर, प्रभाग समिती कार्यालय क्र.३ झेंडीगेट, प्रभाग समिती कार्यालय क्र.४ बुरुडगाव या ठिकाणी स्वीकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती/ सूचनांचा विचार केला जाणार नाही.

नक्की वाचा : अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या : आमदार संग्राम जगताप

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ ते १७ करीता तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादींबाबत काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील अशा मतदारांनी नमुना अ मध्ये आणि तक्रारदारांनी नमुना ब मध्ये (नमूना ‘अ’ व ‘ब’ महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. उपरोक्त विहीत कालावधीत हरकती व सूचना दाखल कराव्यात. प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर १) लेखनिकांच्या काही चुका, २) दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले, ३) संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, ४) मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास अशा सुधारणा / दुरूस्ती करता येतील. अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ ते १७ करीता तयार करण्यात आलेल्या फोटोसहीत प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार प्रति पृष्ठ २ रुपये याप्रमाणे अहिल्यानगर महापालिका येथे विक्रीस उपलब्ध आहेत.

प्रारुप मतदार यादी (AMC)

प्रभाग क्रमांक – पुरुष – महिला – इतर – एकूण

१ – ११४६८ – ११०२७ – ९ – २२४९५

२ – १०८६८ – १०२३० – ० – २१०९८

३ – ७५६९ – ७२६१ – १ – १४८३०

४ – ९६४२ – ९६०९ – ० -१९२५१

५ – ७९५७ – ८३३१ – ० – १६३८०

६ – ७९११ – ७९२९ – ० – १५८४०

७ – ८२८९ – ८२२७ – ० – १६५१६

८ – ९४३२ – ८५८६ – १ – १८०२०

९ – ९१०८ – ९१४३ – ३ – १८२५४

१० – १०७५४ – १०८११ – २ – २१५६६

११ – १०२२९ – ९९३२ – ० – २०१६१

१२ – ९९८२ – ९८२७ – ० – १९८०९

१३ – ७९५० – ७८९५ – ९२ – १५८४५

१४ – ८४९१ – ८१६३ – ० – १६६५४

१५ – ७७२३ – ७५२५ – ० – १५२४९

१६ – १०१९९ – ९४०७ – ० – १९६०६

१७ – ७९५२ – ७४७४ – ० – १५४३५

एकूण – १५५५२४ – १५१३७७ – १०८ – ३०७००९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here