Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई

0
Ladaki bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
Ladaki bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई

नगर: आता लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) गैरफायदा (Disadvantage) घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई (Action against government officials and employees) होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary Action) केली जाणार आहे. सोबतच घेतलेले पैसे वसूल केले जातील. तसेच वेतनवाढही रोखली जाण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा: ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली;पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई (Ladki bahin Yojana)

अडीच कोटी लाडक्या बहिणींची केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. ५ हजार सरकारी कर्मचारी तर ३ हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अडीच कोटी महिलांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची आतापर्यंत ई केवायसी पूर्ण झाली आहे.

अवश्य वाचा: मै सत्यनिष्ठा से…बिहारच्या मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा नितीश कुमार   

लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आता छाननी केली जात आहे. पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होईल, त्यानंतर त्या त्या विभागांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात येईल. याविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या ई -केवायसीला मुदतवाढ (Ladki bahin Yojana)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी १८ नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आता त्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे. राज्यातील काही भागात पूराची स्थिती निर्माण झाल्यामुळे, तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आलं नव्हतं. अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.