Kiran Lahamte : अकोलेत आमदार लहामटे यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

Kiran Lahamte : अकोलेत आमदार लहामटे यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

0
Kiran Lahamte : अकोलेत आमदार लहामटे यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
Kiran Lahamte : अकोलेत आमदार लहामटे यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

Kiran Lahamte : अकोले: तालुक्यातील लिंगदेव येथील वाळीबा होलगीर या शेतकर्‍याला आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांनी मारहाण (Beating) केल्याच्या निषेधार्थ अकोले शहरातून जाणार्‍या कोल्हार-घोटी मार्गावरील महात्मा फुले चौकात गुरुवारी (ता.२०) दोन तास रास्ता रोको आंदोलन (Farmers Block Roads) करण्यात आले.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई

आमदार लहामटे यांच्या कार्यपद्धतीवर टीका

आमदारांनी होलगीर कुटुंबियांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लिंगदेव ग्रामस्थ, कानडी समाज व विविध पक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आमदार लहामटे यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. येत्या निवडणुकीत अशाप्रकारे शेतकर्‍यांना मारहाण करणार्‍या आमदारांना मतदान न करण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले. दरम्यान, ऐन आठवडे बाजारच्या दिवशी या आंदोलनामुळे अकोले-संगमनेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर

फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी (Kiran Lahamte)

याप्रकरणी आमदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी केली. २०१९ ला आम्ही वर्गणी काढून निवडून दिले, त्यांना आता सत्ता आणि संपत्तीची नशा आल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनात बी. जे. देशमुख, बाजीराव दराडे, कानडी समाज सुधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष बबन सदगीर, भाजपचे मंडलाध्यक्ष राहुल देशमुख, बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, लिंगदेवचे सरपंच अमित घोमल, रासपचे तालुकाध्यक्ष भगवान करवर, संपत घोडसरे, नामदेव घोडसरे, त्र्यंबक बेणके आदी सहभागी झाले होते. शेवटी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व नायब तहसीलदार किसन लोहरे यांना निवेदन दिले.