Amol Khatal : संगमनेरातून काँग्रेसचे चिन्ह हद्दपार: आमदार खताळ

Amol Khatal : संगमनेरातून काँग्रेसचे चिन्ह हद्दपार: आमदार खताळ

0
Amol Khatal : संगमनेरातून काँग्रेसचे चिन्ह हद्दपार: आमदार खताळ
Amol Khatal : संगमनेरातून काँग्रेसचे चिन्ह हद्दपार: आमदार खताळ

Amol Khatal : संगमनेर : विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पंजा चिन्हावर निवडणूक (Elections) लढणाऱ्या काँग्रेसच्या एका राष्ट्रीय नेत्याचा माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने पराभव केला. आता तर संगमनेर नगरपालिकेत काँग्रेसचे (Congress) पंजा चिन्हच हद्दपार झाले आहे. हे त्या स्वयं घोषित राष्ट्रीय नेत्याने विचार करावा, अशी सडकून टीका आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी केली.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई

शहरात सर्व सामान्य जनतेकड उमेदवारीचे स्वागत

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले की, आमचे परिवाराचे मतदान घुलेवाडी हद्दीमध्ये असल्याने माझ्या परिवारात उमेदवारी देणार नसल्याचे आधीच सांगितले होते. नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडे दुसरे नावही होते, परंतु सर्व चाचण्या, चर्चा आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या त्यामध्ये तांबे–थोरात यांचा पराभव करण्यासाठी खताळ परिवारातीलच उमेदवार दिला पाहिजे, अशी सर्व कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची मागणी होती. अगदी शेवटच्या दोन दिवसांत नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा संदीप खताळ यांचे नाव अंतिम झाले. त्यानंतरच अगदी जड अंतःकरणाने खताळ यांना उमेदवारी द्यावी लागली असल्याचे आमदार खताळ यांनी सांगून फक्त सोशल मीडिया वरच त्यांच्या नावाला विरोध होत आहे. परंतु शहरात प्रत्यक्ष फिरलो असता सर्व सामान्य जनतेनेच त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले.

नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर

संगमनेरकर जनतेला प्रत्यक्ष विकास हवा (Amol Khatal)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने संगमनेर तालुक्यात मोठी विकासकामे सुरू आहेत. शहरातील रस्ते गटारी विज स्वच्छतागृहे यासारख्या अति महत्त्वाच्या समस्या गंभीर आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या अडचणी गंभीर आहेत. नुसते व्हिजन दाखवून चालत नाही,  तर संगमनेरकर जनतेला प्रत्यक्ष विकास हवा आणि तो विकास महायुती सरकारच्या माध्यमातूनच होऊ शकतो. काहीजण राजकारणाचे ध्रुवीकरण करण्यासाठी कुठल्या आघाड्या केल्या आहेत, हे मला माहिती नाही. या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास तसेच नगरसेवक पदाचे उमेदवारही निवडून येतील आणि नगर परिषदेत देखील परिवर्तन होईल, असा विश्वासही आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.