Smriti Mandhana and Palash Muchhal: वर्ल्डकप जिंकलेल्या जागेवरच दिली प्रेमाची कबुली;पलाशने रोमँटिक स्टाईलने स्मृतीला केलं प्रपोज

0
Smriti Mandhana and Palash Muchhal:वर्ल्डकप जिंकलेल्या जागेवरच दिली प्रेमाची कबुली;पलाशने रोमँटिक स्टाईलने स्मृतीला केलं प्रपोज
Smriti Mandhana and Palash Muchhal:वर्ल्डकप जिंकलेल्या जागेवरच दिली प्रेमाची कबुली;पलाशने रोमँटिक स्टाईलने स्मृतीला केलं प्रपोज

नगर: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोजर व फिल्म मेकर (Film Maker) पलाश मुच्छल (Palash Muchhal) हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. आता दोघांनीही त्यांचा साखरपुडा उरकला आहे. स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन या साखरपुड्याची हटके अनाउन्समेंट केली आहे. आता स्मृती पाठोपाठ तिचा होणारा नवरा पलाश मुच्छलनंही स्मृतीला हटके स्टाईलने प्रपोज (Propose in a unique style) केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई


इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पलाश त्याची होणारी बायको स्मृती मानधनाला चक्क क्रिकेटच्या मैदानात गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसतोय. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर स्मृतीला सरप्राईज देत पलाशनं प्रपोज केलं. विशेष बाब म्हणजे  जिथे टीम इंडियाने विश्वविजेतेपद जिंकून इतिहास रचला, त्याच ठिकाणी पलाश मुच्छलने स्मृतीला प्रपोज केले. या व्हिडीओमध्ये स्मृती सोबत पलाश सुद्धा इमोशनल झाल्याचं पाहायला मिळतंय. पलाशनं शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळतंय. क्रिकेटपटू स्मृती मानधना २३ नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छल याच्याशी लग्न करणार आहे.

अवश्य वाचा: थंडीच्या काळात तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स  

पलाशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय ? (Smriti Mandhana and Palash Muchhal)

https://www.instagram.com/reel/DRTwX4LDfuY/?igsh=ZHJqZjE0ejgydWUx

पलाश मुच्छलनं  शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीलाच पलाश आणि स्मृती डीव्हाय पाटील स्टेडियममध्ये एन्ट्री करताना दिसतायत. पण, स्मृतीचे डोळे झाकलेले आहेत आणि पलाश तिला हात पकडून स्टेडियममध्ये घेऊन येतोय. जसं स्मृती तिच्या डोळ्यावरची पट्टी काढते, तसा तिला आश्चर्याचा धक्का बसतो. तेवढ्यात पलाश गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत एक लाल गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देतो आणि गुडघ्यावर बसून तो तिला अंगठी घालून प्रपोज करतो. त्याच क्षणी स्मृती खूपच इमोशनल होते. तसा पलाशही काहीसा भावूक होतो आणि स्मृतीला मिठी मारतो.

स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छल कोण? (Smriti Mandhana and Palash Muchhal)

२२ मे १९९५ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेले पलाश मुच्छल एका मारवाडी कुटुंबात वाढला आहे. जिथे संगीत हेच या कुटुंबाची मातृभाषा आहे.  त्याची बहीण पलक मुच्छल एक लोकप्रिय पार्श्वगायिका आहे. पलाशनं देखील खूप लहान वयातच आपली स्वतःची ओळख निर्माण केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या पलाशनं अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. म्युझिक कंपोजर व फिल्म मेकर म्हणून त्याने आपली मोठी ओळख निर्माण केली आहे. ही मुच्छल भावंड त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी देखील ओळखली जातात. हृदय शस्त्रक्रियेची गरज असलेल्या वंचित मुलांसाठी हे दोघे बहीण-भाऊ मोठा निधी उभारतात. आता, स्मृती लवकरच पलाशसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.