Bus Station Survey : अहिल्यानगर शहरातील बस स्थानकांचे सर्वेक्षण

Bus Station Survey :अहिल्यानगर शहरातील बस स्थानकांचे सर्वेक्षण

0
Bus Station Survey :अहिल्यानगर शहरातील बस स्थानकांचे सर्वेक्षण
Bus Station Survey :अहिल्यानगर शहरातील बस स्थानकांचे सर्वेक्षण

Bus Station Survey : नगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना (Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Clean, Beautiful Bus Station Campaign) अंतर्गत अहिल्यानगर शहरातील राज्य परिवहन महा मंडळाच्या (MSRTC) तारकपूर, माळीवाडा, स्वस्तिक या शहरातील तिन्ही बसस्थानकांचे शुक्रवारी (ता २१) सर्वेक्षण (Bus Station Survey) करण्यात आले.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई

जास्त गुण मिळविणाऱ्या बसस्थानकांना मिळणार बक्षीस

यामध्ये राज्य परिवहन विभागाच्या पुणे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, पुणे प्रादेशिक अभियंता मुकुंद नगराळे यांनी शहरातील तिन्ही बसस्थानकांचे सर्वेक्षण करत अभिप्राय नोंदवाला. या अभियानांतर्गत बस स्थानकांमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठीच्या विविध सोयी सुविधा, पिण्याचे पाणी, सुलभ शौचालयातील स्वच्छता व सुविधा, कचरा विल्हेवाट, रंग रंगोटी, कर्मचारी गणवेश,
स्वछता, पार्किंग व्यवस्था आदी भौतिक सोई सुविधा तपासण्यात आल्या. या अभियानांतर्गत राज्यातील जास्त गुण मिळविणाऱ्या बसस्थानकांना बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती पुणे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांनी दिली.

नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर

यावेळी उपस्थिती (Bus Station Survey)

यावेळी तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे, स. वा. नि. गोविंद पीडियार, स. वा. नि. संजय गर्जे, वाहतूक नियंत्रक किशोर केरूळकर, वाहतूक नियंत्रक, नितीन गाली, आगार लेखा प्रमुख दीपाली धारक, पत्रकार संतोष आव्हाड, प्रेम कांबळे यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.