Fraud : नगर : नेप्ती कांदा मार्केट (Nepti Onion Market) मधील व्यापाऱ्याकडून ट्रान्सपोर्टद्वारे कांदा खरेदी करुन कांदा खरेदी मालाचे १ कोटी ६१ लाख रुपये न देता व्यापाऱ्याची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) कर्नाटक राज्यातील ३ जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
विश्वास संपादन करून नंतर फसवणूक (Fraud)
याबाबत कांदा व्यापारी विलास जनार्दन दरंदले (वय ३१, रा. बुरूडगाव रोड, अहिल्यानगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. फिर्यादी यांचा नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट येथे कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांच्याकडून २० जून २०२४ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान हनीफ बागवान, मोहम्मद शफी, मोहम्मद शमी (सर्व रा. बिलालाबाद, कुलबर्गी, कर्नाटक) यांनी विश्वास संपादन करून ट्रान्सपोर्टद्वारे वेळोवेळी १० कोटी ६ लाख ३९ हजार ८४३ रुपये किंमतीचा ४६ हजार २९० गोण्या कांदा खरेदी केला. या कांद्याची ८ कोटी ४५ लाख ३९ हजार २७० रुपये त्यांनी फिर्यादीला दिले. मात्र, उर्वरित १ कोटी ६१ लाख रुपयांची रक्कम त्यांनी फिर्यादी यास दिली नाही. वेळोवेळी पैशाची मागणी केली असता त्यांनी फिर्यादी यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली व पैसे देण्यासही नकार दिला. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर



