Elections : श्रीगोंदा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट पडली असून नगराध्यक्षपदासाठी (Mayor Post) चौरंगी लढत होणार आहे. महायुती मधील भाजप (BJP), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (NCP) हे श्रीगोंद्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने श्रीगोंदा नगरपरिषद (Shrigonda Municipal Council) निवडणुकीत (Elections) चौरंगी लढत होणार आहे.
अवश्य वाचा : पाथर्डीतील निवडणूक चित्र बदलले; १४ अर्ज मागे, तिरंगी लढतीचे संकेत
पहिल्यांदाच चौरंगी लढत
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून अर्ज माघारीच्या दिवशी ९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता एका जागेसाठी चार पक्षाच्या चार उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होणार असल्याने ही लढत हाय होल्टेज होणार असल्याचे दिसून येत आहे. नगरसेवक पदाच्या शर्यतीतून एकूण २६ जणांनी माघार घेतली आहे. श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत पहिल्यांदाच चौरंगी लढत होत आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित
महाविकास आघाडीकडून गौरी गणेश भोस मैदानात (Elections)
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीपासूनच यावेळी ही निवडणूक चौरंगी होणार असे चित्र होते. परंतु उमेदवारी अर्ज माघे घेण्याच्या दिवशी सर्व पाचपुते विरोधक एकत्र येतील एकास एक लढत होईल असे बोलले जात होते. परंतु ती फक्त शक्यताच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. श्रीगोंद्यात पाचपुते कुटुंबाकडून इंद्रायणी पाचपुते यांचा दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने भाजपकडून तयार झालेली उत्सुकता संपत सुनीता खेतमाळीस याच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) कडून ज्योती सुधीर खेडकर तर शिवसेना (ठाकरे गट) उपनेते साजन पाचपुते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बाबासाहेब भोस आणि काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांचे बंधू प्रशांत ओगले यांनी एकत्रित येत महाविकास आघाडीचा पॅनल तयार करत गौरी गणेश भोस यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवले आहे.



