Law and Order : शहराचा एकोपा आणि सलोखा सर्वांनी अबाधित राखावा : तहसीलदार

Law and Order : शहराचा एकोपा आणि सलोखा सर्वांनी अबाधित राखावा : तहसीलदार

0
Law and Order : शहराचा एकोपा आणि सलोखा सर्वांनी अबाधित राखावा : तहसीलदार
Law and Order : शहराचा एकोपा आणि सलोखा सर्वांनी अबाधित राखावा : तहसीलदार

Law and Order : कर्जत : कर्जत शहराचा (Karjat City) एकोपा आणि सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्व शहरवासीयांची असून यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) कायम राखत जे काही वाद-विवाद उपस्थित झाले आहेत ते सामोपचाराने व प्रशासनाच्या चौकटीत पार पाडावे. कर्जत शहरातील ईदगाह मैदान आणि परिसरातील सर्व जागेची मोजणी भूमी अभिलेख विभागाकडून (Land Records Department) होत नाही, तोपर्यंत कोणी ही कायदा हातात घेऊ नये आणि गावाचा एकोपा कायम राखावा, असे आवाहन तहसीलदार रवी सतवन यांनी केले. ते कर्जत येथे पोलीस प्रशासन आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, मुख्याधिकारी अक्षय जायभाये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील सौताडे उपस्थित होते.

कर्जत शहरातील वादग्रस्त जागेवरील दुकानासमोर शुक्रवारी रात्री फलक लावण्यात आला. या फलकावरून शहरातील जातीय सलोखा बिघडू नये याची खबरदारी म्हणून कर्जत पोलीसांनी शनिवारी तहसीलदार रवी सतवन यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी दोन्ही समूहाचे मोजके प्रतिनिधी यासह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाट म्हणाले की,

प्रशासन हे जनतेच्या हितासाठी काम करत असते. यासाठी जनतेचा विश्वास आवश्यक असून त्या विश्वासाशिवाय लोकाभिमुख कार्य प्रशासन कधीच करू शकत नाही. गावाच्या भल्यासाठी गावातीलच व्यक्तींनी पुढाकार घेत उपस्थित झालेले प्रश्न कोणावर ही अन्याय होणार नाही या भावनेने पारदर्शकपणे प्रशासनास सोबत घेत कायद्याच्या चौकटीत सोडवावे. गावाची समता, बंधूता आणि एकता यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची सर्वच घटकांची जबाबदारी आहे. ती सामोपचाराने पार पाडावी असे आवाहन करीत दोन्ही समूहांना एकत्र येत यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले.

प्रशासकीय निर्णय सर्वांना बंधनकारक राहील (Law and Order)

यावेळी उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, नगरसेवक नामदेव राऊत, सुनील शेलार, चंदनसिंग परदेशी, सतीश पठाडे, प्रा.समशेर शेख, माजिद पठाण, बाबा पठाण यांनी आपल्या प्रतिक्रिया आणि अडचणी प्रशासनासमोर मांडत यावर प्रशासकीय जे काही योग्य असेल ते पारदर्शक निर्णय घ्यावा. यात कोणत्याही समूहावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यानुसार घेतलेला प्रशासकीय निर्णय सर्वांना बंधनकारक राहील याची ग्वाही दिली.