Sampat Barskar : तपोवन परिसरात नवीन बाजारपेठ निर्माण होत आहे : संपत बारस्कर

Sampat Barskar : तपोवन परिसरात नवीन बाजारपेठ निर्माण होत आहे : संपत बारस्कर

0
Sampat Barskar : तपोवन परिसरात नवीन बाजारपेठ निर्माण होत आहे : संपत बारस्कर
Sampat Barskar : तपोवन परिसरात नवीन बाजारपेठ निर्माण होत आहे : संपत बारस्कर

Sampat Barskar : नगर : सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक १ हा नव्याने विकसित होणारा भाग आहे. या ठिकाणी मूलभूत प्रश्नांपासून नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लागत आहे. ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी ड्रेनेज लाईनची कामे अगोदर केली जातात आहेत. भविष्यकाळात तपोवन रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकास कामे सुरु असून या ठिकाणी नवीन बाजारपेठ निर्माण होत आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे (AMC) विरोधी पक्षनेते संपत बारस्कर (Sampat Barskar) यांनी केले.

अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा

रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ

प्रभाग क्रमांक १ मधील दक्षता कॉलनी येथे बंद पाईप व रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माया कोल्हे, चेपस ढवण, सतीश ढवण, स्वप्निल ढवण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार

सागर बोरुडे म्हणाले, (Sampat Barskar)

प्रभाग एक हा विस्ताराने सर्वात मोठा प्रभाग आहे. विकास कामातून प्रभाग नावाप्रमाणेच एक नंबरचा करायचा आहे. आमदार संग्राम जगताप तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रभागाचा कायापालट होत असल्याचे ते म्हटले.