Football Tournament : नगर : अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे (Ahilyanagar District Football Association) माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या गॉडविन कप २०२५ (Godwin Cup 2025) या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेला (Football Tournament) भुईकोट किल्ला येथील मैदानावर प्रारंभ झाले आहे. फुटबॉल मधील खेळाडूंना चालना व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी (Firodia Shivajiyans Football Academy) यांच्या वतीने, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली आणि डिक परिवाराच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा
गॉडविन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेचे उद्घाटन
गॉडविन डिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व आकाशात फुगे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, सचिव रोनाप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, सदस्य व्हिक्टर जोसेफ, फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या कोअर कमिटी सदस्य पल्लवी सैंदाणे, अभिषेक सोनवणे, श्रेया सागडे, राजेश अँथनी, सचिन पठारे, ज्येष्ठ खेळाडू मयूर गोरखा आदींसह खेळाडू उपस्थित होते.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार
आठवडाभर रंगणार फुटबॉलचे सामने (Football Tournament)
या वर्षीच्या द्वितीय आवृत्तीत जिल्ह्यातील एकूण १२ संघ सहभागी होत असून एक आठवडाभर फुटबॉलचे सामने रंगणार आहे. जिल्ह्यातील अनेक उद्योन्मुख खेळाडूंना ही स्पर्धा आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी पहिला सामना राठोड एफसी विरुध्द डॉन बॉस्को एफसी यांच्यात होणार आहे. दुसरा सामना पहिल्या सामन्यानंतर तत्काळ बाटा एफसी विरुध्द फिरोदिया शिवाजीयन्स एफसी (ब) (यजमान संघ) यांच्यात होणार आहे.
गॉडविन कप ही स्पर्धा फुटबॉलचा उत्सव असून, दिवंगत गॉडविन डिक यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण आहे. त्यांनी फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी व खेळाडू घडविण्यासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून, फुटबॉलसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. ही स्पर्धा म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेली आदरांजली आहे. नगरच्या फुटबॉल क्षेत्रात गॉडविन डिक यांनी घातलेल्या मजबूत पायावर आधारित हा स्पर्धेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या स्पर्धेद्वारे केला जात असल्याची भावना उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केली. फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.



