Noise Pollution : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील शेंडी परिसरातील एका लॉनसमोर डीजे सिस्टीमवर कर्णकर्कश आवाजात गाणी लावून मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण (Noise Pollution) केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई
ध्वनी प्रदूषण नियमाअंतर्गत कारवाई
हा प्रकार शनिवारी (ता. २२)रात्री ८.५१ वाजता घडला. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार उमेश शेरकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. दत्तात्रय रमेश पाचपिंड (रा. मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषण नियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन
डीजेवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून ध्वनीप्रदूषण (Noise Pollution)
फिर्यादीनुसार, दत्तात्रय पाचपिंड याने सार्वजनिक ठिकाणी डीजेवर मोठ्या आवाजात गाणी वाजवून परिसरात ध्वनीप्रदूषण निर्माण केले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत ही कारवाई केली.



