Online Fraud : नगर : वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन तसेच व्हाट्सॲप (WhatsApp) द्वारे व्हिडीओ कॉल करून मुंबई सायबर सेल (Mumbai Cyber Cell) मधून बोलत असल्याचे सांगून ८ लाख ८० हजारांची फसवणूक करणारे तिघे सायबर पोलिसांनी (Cyber Police) ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नक्की वाचा : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
विजय रंगनाथ चेमटे (रा-भाळवणी ता. पारनेर जि. अहिल्यानगर), अभिजित अजिनाथ गिते (रा-दादेगांव ता. आष्टी जि. बिड), अक्षय संजय तांबे (रा-सलाबतपूर ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हल्ली रा-द्वारका पॅलेस लक्ष्मी चौक दत्त कॉलनी हिजवडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा: श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला
सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात (Online Fraud)
याबाबत संदीप हरिभाऊ कुलथे (रा-सावेडी अहिल्यानगर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असता सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी या गुन्ह्याचा बारकाईने व सखोल तपास करुन हा गुन्हा विजय चेमटे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलीस अंमलदार मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, निळकंठ कारखेले, रावसाहेब हुसळे यांच्या पथकाने केली.
संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयास्पद, अनोळखी लिंक, कॉल, ओटीपी किंवा अनोळखी व्यव्हारांवर विश्वास ठेवू नका. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर हेल्पलाईन १९३० किंवा १९४५ वर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.



