Champa Shashti : संगमनेरमध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा उत्साहात

Champa Shashti : संगमनेरमध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा उत्साहात

0
Champa Shashti : संगमनेरमध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा उत्साहात
Champa Shashti : संगमनेरमध्ये चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा उत्साहात

Champa Shashti : संगमनेर : चंपाषष्ठी (Champa Shashti) उत्सवानिमित्त साळीवाडा येथील मल्हार मार्तंड खंडोबा मंदिरात (Malhar Martand Khandoba Temple) मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषा मध्ये खंडोबा-म्हाळसा यांचा शुभमंगल सावधान विवाह सोहळा पार पडला. यावेळी खंडोबा देवाचे ‘मामा’ होण्याचा मान खंडोबा भक्त व व्यापारी मदन पारख यांना देण्यात आला, तर म्हाळसा देवीचे ‘मामा’ म्हणून आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांना मान देण्यात आला.

नक्की वाचा : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस

मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवाची रंगत दुपटीने वाढली होती. साळीवाडा येथून खंडोबा देवाच्या पालखीची वाजत-गाजत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी साडेबारा वाजता हजारो खंडोबा भक्तांच्या उपस्थितीत खंडोबा आणि म्हाळसा यांचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ आणि, त्यांची पत्नी नीलम खताळ, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच होलमराजा भक्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

अवश्य वाचा: श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला

वांगे-भरीत, भाकरी आणि बुंदीचा महाप्रसाद (Champa Shashti)

देवाच्या शुभविवाहानंतर भक्तांनी पारंपरिक तळी भरणे आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला. भाविकांसाठी वांगे-भरीत, भाकरी आणि बुंदीचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता. हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेत भक्तीभावाने चंपाषष्ठी उत्सव साजरा केला. यावेळी खंडोबा देवस्थानचे आप्पासाहेब केसकर, मदन पारख होलम, राजा काटकर मंडळाचे प्रमुख तुकाराम काठे, गोविंद भरीतकर, संभाजी तनपुरे, भारत काळे, श्रीगोपाल पडताणी, पुरुषोत्तम जोशी यांच्यासह खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.