Nagar-Jamkhed Highway : नगर–जामखेड महामार्गाच्या कामा विरोधात चिचोंडी पाटील ग्रामस्थांचा निषेध

Nagar-Jamkhed Highway : नगर–जामखेड महामार्गाच्या कामा विरोधात चिचोंडी पाटील ग्रामस्थांचा निषेध

0
Nagar-Jamkhed Highway : नगर–जामखेड महामार्गाच्या कामा विरोधात चिचोंडी पाटील ग्रामस्थांचा निषेध
Nagar-Jamkhed Highway : नगर–जामखेड महामार्गाच्या कामा विरोधात चिचोंडी पाटील ग्रामस्थांचा निषेध

Nagar-Jamkhed Highway : नगर : नगर–जामखेड महामार्गाच्या (Nagar-Jamkhed Highway) नुतनीकरणामुळे चिचोंडी पाटील तसेच मार्गावरील निंबोडी, सारोळा, टाकळी काझी, दशमी गव्हाण, आठवड या गावांमध्ये उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाने (Administration) तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी तातडीने स्पीडब्रेकर बसवावे अशी मागणी होत आहे. निवेदन चिचोंडी पाटील (Chichondi Patil) ग्रामपंचायतीचे सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभाग व आरआरएसएम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सादर करण्यात आले.

नक्की वाचा : प्रा. राम शिंदे यांच्याविरुध्द अवमानकारक वक्तव्य करणारे सूर्यकांत मोरे यांना हक्कभंगाची नोटीस

कामातील त्रुटींमुळे भविष्यात गंभीर अडचणी

नगर–जामखेड रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून जलद गतीने सुरू असून कंपनीचे ग्रामस्थांनी आभार मानले. मात्र, या कामात झालेल्या अनेक त्रुटींमुळे भविष्यात गंभीर अडचणी निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महामार्गासाठी जागा देणाऱ्या निंबोडी, सारोळा, टाकळी काझी, दशमी गव्हाण, चिचोंडी पाटील, आठवड या गावांतील शेतकऱ्यांना अद्याप एकाही पैशाचा मोबदला मिळालेला नाही. रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या घरांना, दुकाने व इतर मालमत्तेला किती भरपाई दिली जाणार याची कोणतीही अधिकृत माहिती नाही.

अवश्य वाचा: श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला

रस्ता ५ फूट उंच केल्याने रस्त्यावर येणे कठीण (Nagar-Jamkhed Highway)

गावठाण हद्दीत जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल असल्याने वाहतूक वेगाने वाढणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कायवॉक ब्रिजची तातडीने निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली व गावातील महत्त्वाच्या रस्त्यांवरून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी –भातोडी रस्ता, सांडवा रस्ता, लोणी रस्ता, पिंपळा रस्ता, दवाखाना शेजारील रस्ता, दोन ग्रामपंचायत रस्ते, नांदूर रस्ता, दौलावडगाव रस्ता, बस स्थानक या सर्व ठिकाणी डिव्हायडर कुठे खुले किंवा बंद राहणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. अनेक पत्रव्यवहार होऊनही मंदिरासंबंधी नियोजन कळवण्यात आलेले नाही. गावातील ड्रेनेज लाईन उंचावर गेल्याने साईनगर परिसरासह संपूर्ण गावातील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा येणार आहे. लोणी रोडवरील पावसाळी पाण्यासाठीही कोणतीही योजना नसल्याचे ग्रामस्थांचे म्हटले आहे. भातोडी रस्ता–मेहेत्रे भेळ परिसरातील गटार जमीन पातळीपेक्षा ५ फूट उंच केल्याने ग्रामस्थांना रस्त्यावर येणेही कठीण झाले आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून गावातील सर्व प्रमुख रस्ते मजबुतीने काँक्रीट करण्याची मागणी. अपघात टाळण्यासाठी तातडीने स्पीडब्रेकर आवश्यक.


न्यू इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, बसस्थानक, दवलावडगाव रस्ता अशा संवेदनशील ठिकाणी स्पीडब्रेकर नसल्यास भविष्यात गंभीर अपघात संभवतात. नगर–दौंड रस्त्याप्रमाणे शेकडो अपघातांची पुनरावृत्ती या महामार्गावर होऊ नये, यासाठी स्पीडब्रेकरची मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष व सरपंच शरद पवार, उपसरपंच विश्वसागर कोकाटे, उपाध्यक्ष प्रकाश पोटे, विठ्ठल कोकाटे, वैभव कोकाटे, डॉ. राहुल पवार, मच्छिंद्र खडके, चंदू पवार, सुरेश मेहेत्रे, भाऊ मांढरे, प्रशांत पवार, राम पवार, रवी पवार, भास्कर खडके, प्रल्हाद खांदवे, संदीप कोकाटे, शशिकांत आगलावे, विशाल आगलावे, श्रीकांत कराळे, किरण मोरे, राजू तनपुरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, व्यावसायिक व शेतकरी उपस्थित होते.