
Fraud : नगर : पोलीस अधीक्षक-कार्यालयात (Office of the Superintendent of Police) नार्कोटिक्स शाखेची अधिकारी असल्याचे भासवून महिलेने एका टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची ३२ हजार २०० रूपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना समोर आली आहे. तपासकामाच्या नावाखाली महिलेने हा प्रकार केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) स्नेहा सरे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) नामक महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून बेदम मारहाण; श्रीरामपूर शहरात खळबळ
३२ हजार २०० रूपयांची फसवणूक
फैसल अलीअजगर पिरमोहमंद झाडा (वय ३०, रा. नालसाब चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. कार भाड्याने घेत तसेक ऑनलाईन पैसे घेऊन ३२ हजार २०० रूपयांची फसवणूक केली आहे. स्नेहा नामक महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर येथील नार्कोटिक्स शाखेत अधिकारी असल्याची बतावणी केली. मला स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे मार्गे सीएसटी नार्कोटिक्स विभाग, मुंबई येथे तपासकामी जायचे आहे, असे सांगून तिने फिर्यादीची कार भाड्याने घेतली.
नक्की वाचा : डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरणात तिघे जेरबंद
पैसे न देता आपला मोबाईल बंद करून टाकला (Fraud)
अहिल्यानगर ते वाशी या प्रवासादरम्यान त्या महिलेने फिर्यादीकडून ऑनलाईन २५ हजार रूपये घेतले आणि गाडीचे भाडे ७ हजार २०० रूपये असे मिळून एकूण ३२ हजार २०० रूपये मुंबईला पोहोचल्यावर रोख देण्याचे आश्वासन दिले. मात्र, वाशी येथे पोहोचल्यावर त्या महिलेने पैसे न देता आपला मोबाईल बंद करून टाकला आणि तेथून पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल केला.


