Crime : तत्कालीन चार सहाय्यक आयुक्तांसह सात जणांविरूध्द गुन्हा; शिष्यवृत्तीचा दस्तऐवज नष्ट केल्याचा आरोप

Crime : तत्कालीन चार सहाय्यक आयुक्तांसह सात जणांविरूध्द गुन्हा; शिष्यवृत्तीचा दस्तऐवज नष्ट केल्याचा आरोप

0
Crime : तत्कालीन चार सहाय्यक आयुक्तांसह सात जणांविरूध्द गुन्हा; शिष्यवृत्तीचा दस्तऐवज नष्ट केल्याचा आरोप
Crime : तत्कालीन चार सहाय्यक आयुक्तांसह सात जणांविरूध्द गुन्हा; शिष्यवृत्तीचा दस्तऐवज नष्ट केल्याचा आरोप

Crime : नगर : माहिती अधिकार कायद्याचा (Right to Information Act) वापर करून शिष्यवृत्तीच्या (Scholarship) कागदपत्रांची माहिती मिळवणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने येथील समाज कल्याण विभागातील (Social Welfare Department) तत्कालीन चार सहाय्यक आयुक्त आणि तीन लिपीकांवर आरोप करणारी फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) दाखल केली आहे.

अवश्य वाचा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून बेदम मारहाण; श्रीरामपूर शहरात खळबळ

कागदपत्रे जाणूनबुजून नष्ट केल्याचा संशय

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या उत्पन्न दाखल्याचा तपशील असलेली महत्त्वाची कागदपत्रे जाणूनबुजून नष्ट केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.पुणे येथे माहिती तंत्रज्ञान विभागात कार्यकारी अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले रोहित शिवाजी कदम (रा. सुवर्णनगर, कराड रस्ता, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा : डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरणात तिघे जेरबंद

माहिती नष्ट झाल्याचे फिर्यादींचे म्हणने (Crime)

सन २००६ ते २०१० दरम्यान येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचे तात्कालीन सहाय्यक आयुक्त आर. एम. मुन्शी, प्र. सहाय्यक आयुक्त आर. के. मोरे, सहाय्यक आयुक्त रतन बनसोडे, सहाय्यक आयुक्त पी. सी. चव्हाण, शिष्यवृत्ती विभागामधील कनिष्ठ लिपीक दयानंद जगताप, वरिष्ठ लिपीक सुरेश राजाराम काजवे, कनिष्ठ लिपीक विलास ज्ञानदेव मोरे यांच्याविरूध्द महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी माहिती अधिकारात समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती संदर्भात माहिती मागविली होती. मात्र, त्यांना अर्धवट व चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी पुन्हा अपील केले. त्यानुसार मिळालेल्या माहिती सोनई येथील शैक्षरिक वर्ष २००५ ते २००९-१० या कालावधीतीत माहिती नष्ट झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.