
Illegal Sand Transport : नगर : संगमनेर तालुक्यातील मांडवे येथे अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून ५ लाख ६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात (Ghargaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून बेदम मारहाण; श्रीरामपूर शहरात खळबळ
घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राहुल किशोर खेमनर (वय -२१, रा. मांडवे बु, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर), रवींद्र संजय मोरे (वय. २३,रा. मांडवे बु,ता. संगमनेर जि. अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नावे आहेत. त्यांच्याकडून ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन, असा एकूण पाच लाख ६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अमृत आढाव यांनी फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरणात तिघे जेरबंद
किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कारवाई (Illegal Sand Transport)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील मांडवे ते शिंदोडी जाणारे तरंगेवस्ती परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव यांच्या पथकाने केली आहे.


