
Championship Kabaddi Tournament : नगर : अहिल्यानगरच्या कबड्डीपटूंनी (Kabaddi Players) राज्यभर निर्माण केलेला हा दबदबा, त्यांच्या कष्टांची, जिद्दीची अन् न थकणाऱ्या जिंकण्याच्या वृत्तीची जिवंत साक्ष देतो. अहिल्यानगर येथील जी. एम. स्पोर्टस फाऊंडेशन व आनंद विद्यालयाच्या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी ढवण व फौजिया शेख या वर्गमैत्रिणींची हरियाणा येथे २७ ते ३० दरम्यान आयोजित राष्ट्रीय किशोर किशोरी गट अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी (Championship Kabaddi Tournament) महाराष्ट्र संघात निवड झाली.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
भिमानास्पद परंपरा आणखी उजळली
नुकत्याच बोपखेल (पुणे) येथे आयोजित ३६ व्या किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगरचा संघ उपविजेता ठरला होता. यातून नगरच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. अंतिम संघ निवडीसाठी या स्पर्धेसह शिबिरात उत्तम कामगिरी करणाऱ्या श्रेया अडसूळ, ज्ञानेश्वरी ढवण व फौजिया शेख यांची निवड होणे अपेक्षित होते; परंतु अगदी ऐनवेळी मुंबई येथून फोनद्वारे घोषित झालेल्या संघामध्ये दोन खेळाडूंची अंतिम संघात निवड झाल्याचे कळविण्यात आले. अहिल्यानगरची मातीनं ‘एकसे बढकर एक’ कबड्डीपटू जन्माला घातले आहेत. राज्यापासून राष्ट्रीयस्तरापर्यंत कर्णधारपदाची उंची गाठणारे खेळाडू याच भूमीतून घडले, ही अभिमानास्पद परंपरा आता आणखी उजळली आहे.
नक्की वाचा : बोल्हेगाव परिसरात बिबट्याचा हल्ला
सर्वांनी केले अभिनंदन (Championship Kabaddi Tournament)
महाराष्ट्राच्या किशोरी संघात अहिल्यानगरच्या ज्ञानेश्वरी ढवण व फौजिया शेख या वर्गमैत्रिणींची निवड होऊन जिल्ह्याचा गौरव वाढलाच; पण त्यात भर घालत ओन्ली साई क्रीडा मंडळाचा जिगरबाज खेळाडू समर्थ हेलुडे महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून निवडला गेला, हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा सुवर्णक्षण ठरला आहे. खेळाडूंच्या या यशामध्ये ‘जीएम’चे प्रशिक्षक विनायक भुतकर, शंतनू पांडव, क्रीडा शिक्षक देवका लबडे, विकास माने, विकास घोलप, मुख्याध्यापक शारदा पोखरकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक रवींद्र अष्टेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, जी. एम. स्पोर्टस फाउंडेशनचे विजयसिंह मिस्कीन व सर्व सदस्य, अहिल्यानगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष खासदार निलेश लंके, सचिव शशिकांत गाडे, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.


