
Sachin Gujar : श्रीरामपूर: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अवमान केला म्हणून काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष सचिन गुजर (Sachin Gujar) यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश सरोदे या तरुणाने फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
मतदारांना खुश करण्यासाठी महाराजांचा एकेरी उल्लेख
ऋषिकेश सरोदे या तरुणाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मोबाईलवरील रिल्स मध्ये असलेल्या एका व्हिडीओत
काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे यांच्या प्रचारासाठी वार्ड नंबर 2 मधील मतदारांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी एकेरी उल्लेख करत अवमान केला होता.
नक्की वाचा : बोल्हेगाव परिसरात बिबट्याचा हल्ला
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Sachin Gujar)
नगरपालिका निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदा होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवामानकारक उल्लेख करत इतर धर्मियांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेषभाव व शत्रुत्व निर्माण होईल, असे विधान केले म्हणून सचिन गुजर याचे विरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे. सदर फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


