
Sangram Jagtap : नगर : केंद्रा सरकारच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या (Ministry of Roads and Transport) वतीने अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड ते कोठी पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठीही सीआरआयएफ फंडातून (CRIF Fund) ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मार्केटयार्ड ते सक्कर चौक पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
अत्याधुनिक पद्धतीने काँक्रीटीकरणाचे काम
शहरातील पुणे रोड वरील उड्डाणपुला खालील मार्केटयार्ड ते सक्कर चौक पर्यंतच्या रस्त्याचे अत्याधुनिक पद्धतीने काँक्रीटीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. शहरातील पुणे रोड वरील उड्डाणपुला खाली मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करून अत्याधुनिक पद्धतीने काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे.
नक्की वाचा : बोल्हेगाव परिसरात बिबट्याचा हल्ला
टप्प्याटप्प्याने हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा करणार (Sangram Jagtap)
केंद्र सरकार व राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. टप्प्याटप्प्याने हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा करणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य लाभत आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.


