Viral : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील आठ महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकून खून केल्याची खळबळजनक (Viral) घटना समोर आली होती. या आठ महिन्याच्या बाळाला त्याच्याच आईने फेकून दिल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले असून संशयित आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीला न्यायालयात हजार केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. सोनाली योगेश दळवी असे ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
याबाबत माहिती अशी की,
कोळगाव येथील सुदाम दळवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत कार्तिक योगेश दळवी (वय ८ महिने) यास कोणीतरी टाकून दिले असल्याची माहिती बेलवंडी पोलिसांना देण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.
नक्की वाचा : बोल्हेगाव परिसरात बिबट्याचा हल्ला
रागाच्या भरात पाण्यात टाकले (Viral)
याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार तपासाची चक्र फिरवत घरातील कार्तिक याची आई, चुलती सुषमा व चुलता ज्ञानेश्वर असे घरी होते. यांच्याकडे विचारपूस केली असता उडवाउडवीची माहिती देण्यात आली. खाकीचा धाक दाखवत कार्तिकची आई सोनाली योगेश दळवी याच्याकडे कसोशीने विचारपूस केली. मुलगा कार्तिक हा झोळीत झोपलेला असताना त्यास झोळीतुन बाहेर काढुन त्यास ब्लॅकेट मध्ये गुंडाळून रागाच्या भरात घराजवळील विहीरीतील पाण्यात टाकुन देऊन त्यास जिवे ठार मारले असल्याचे पोलीस तपासत समोर आले. याबाबत बेलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप निरीक्षक तुळशीराम पवार, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, रवींद्र औटी, कैलास शिपनकर, दादासाहेब क्षिरसागर, विनोद पवार, सुरेखा वलवे, अविंदा जाधव, भाऊसाहेब शिंदे यांच्या पथकाने केली.



