Leopard Captured : नगर : अहिल्यानगर उपनगरातील तपोवन परिसरात असलेल्या बिबट्या (Leopard) वनविभागाने (Forest Department) जेरबंद केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी या परिसरात तीन बिबट्याची पिल्ले वनविभागाने ताब्यात घेतली होती. त्यानुसार या परिसरात सावज लावून पिंजरा लावला होता. आज (ता.२८) पहाटे बिबट्या जेरबंद (Leopard Captured) करण्यात वन विभागाला यश आले आहे.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
बिबट्याची आढळली होती तीन पिल्ले
शहर परिसरात गेल्या ३-४ दिवसातील बिबट्याच्या वावराची ही दुसरी घटना आहे. तपोवन रोडवरील कराळे मळ्यात २५ नोव्हेंबर ला दुपारी बिबट्याची तीन पिल्ले आढळली होती. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला मात्र, बिबट्याने रात्रभर पिंजऱ्याभोवती घिरट्या घालून हुलकावणी दिली होती. दरम्यान बेल्हेगाव परिसरात (ता.२७) रोजी पहाटे एका बिबट्याने मेंढपाळाच्या कळपावर हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नक्की वाचा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल; महाराजांचा अवमान केल्याचा आरोप
वनपाल, वनरक्षक यांनी बिबट्या ताब्यात घेतला (Leopard Captured)
शहरा जवळच बिबट्याचा वावर वाढला आहे. आज पुन्हा तपोवन परिवारातील कराळे यांच्या शेतानजीक एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक यांनी घटनास्थळी बिबट्या ताब्यात घेतला आहे.



