Arun Mundhe: नगर : अवैध वाळू वाहतुकीबाबत (Illegal Sand Transport) महसूल प्रशासनाला माहिती दिल्याच्या कारणातून स्थानिक गाव गुंडांकडून अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी भाजपचे माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे (Arun Mundhe) हे दबाव टाकत आहे. अशी, तक्रार पोलीस अधीक्षकांडे करण्यात आली आहे. याबाबत शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील रवींद्र चेमटे यांनी तक्रार अर्ज दिला आहे.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
तक्रार अर्जात म्हटले आहे की,
शेवगाव तहसीलदार यांनी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी शिंगोरी येथे छापा टाकून ४२ ब्रास वाळूसाठा जप्त केला होता. या कारवाई बाबत माहिती महसूल प्रशासनास दिल्याच्या संशयावरून केशव रुस्तुम नेमटे याने तक्रारदार यांचा भाऊ भागवत काशिनाथ चेमटे याचे पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथून अपहरण करून तोंडोळी येथे नेवून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
नक्की वाचा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल; महाराजांचा अवमान केल्याचा आरोप
खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप (Arun Mundhe)
या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु आहे. हा गुन्हा यामागे घेण्यासाठी आमच्यावर शेवगावचे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.



