Dr. Pankaj Ashiya : नगर : एकदाच वापराच्या प्लास्टिक (Plastic) वस्तूंवर बंदी (Plastic Ban) असतानाही शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साठवणूक, विक्री, वाहतूक आणि वापर सुरू आहे. त्यामुळे व्यापक जनजागृतीबरोबरच साठवणूकदार आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिल्या.
अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार
जिल्हा पर्यावरण समितीची बैठक
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यावरण समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, समितीचे सदस्य तथा हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, प्रा. डॉ. सतीश कुलकर्णी, रविराज पाटील, अमित लाटे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल; महाराजांचा अवमान केल्याचा आरोप
प्रदूषण, नायलॉन मांजावर कारवाईच्या सुचना (Dr. Pankaj Ashiya)
जिल्ह्यातील नगरपालिका व महापालिकांनी दरवर्षी पर्यावरणावरील स्थिती अहवाल तयार करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून हा अहवाल तयार न केल्यामुळे पर्यावरण स्थितीचे अचूक आकलन होत नाही. त्यामुळे येथून पुढे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा अहवाल त्वरित तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत विटभट्ट्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नायलॉन मांजा साठवणूक, वाहतूक, विक्री व वापरावर पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कठोर कारवाई, रस्त्यावरील धूळ नियंत्रणासाठी आधुनिक धूळशोषक यंत्रांचा वापर, नदीप्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, वनक्षेत्र वाढविणे, तसेच पर्यावरण संरक्षण, संवर्धन व जनजागृती उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी.



