Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषद निवडणूक स्थगित; अपील प्रकरणे वाढल्याने निर्णय पुढे ढकलला

Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषद निवडणूक स्थगित; अपील प्रकरणे वाढल्याने निर्णय पुढे ढकलला

0
Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषद निवडणूक स्थगित; अपील प्रकरणे वाढल्याने निर्णय पुढे ढकलला
Pathardi Municipal Council : पाथर्डी नगरपरिषद निवडणूक स्थगित; अपील प्रकरणे वाढल्याने निर्णय पुढे ढकलला

Pathardi Municipal Council : पाथर्डी : नगराध्यक्ष पदासह पाथर्डी नगरपरिषदेतील (Pathardi Municipal Council) सर्वच नगरसेवक पदांची सार्वत्रिक निवडणूक (General Election) पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक (Election) प्रक्रियेतील अपील प्रकरणांमुळे राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी (State Election Officer) हा निर्णय जाहीर केला असून पाथर्डीतील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराने घेतली होती हरकत

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार अभय आव्हाड यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे यांनी हरकत घेतली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आव्हाड यांची उमेदवारी पात्र ठरविली होती. याच निकालाविरुद्ध दाखल करण्यात आलेले अपीलही २५ नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाने फेटाळले व आव्हाड यांची उमेदवारी कायम ठेवली. दरम्यान, राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमांमध्ये नमूद केले आहे की, २३ नोव्हेंबर २०२५ किंवा त्यानंतर जिल्हा न्यायालयाचे निर्णय लागलेल्या अपील प्रकरणातील जागांची निवडणूक ४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमानुसार घेऊ नये. तसेच, अपील प्रकरणात नगराध्यक्ष पदाचा समावेश असल्यास संपूर्ण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक स्थगित करावी, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे

या प्रकारामुळे सर्व पक्षांची प्रचार यंत्रणा ठप्प (Pathardi Municipal Council)

पाथर्डी नगरपरिषदेतील आणखी एका जागेवर तिढा कायम असून, प्रभाग ८अ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार जिजाबाई वाघमारे यांचा अर्ज छाननीवेळी बाद झाल्याने त्यांनीही जिल्हा न्यायालयाची शरणागती पत्करली आहे. त्यांच्या अर्जाबाबतचा निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे. या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक सध्यातरी पूर्णपणे स्थगित झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय काय येतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे तसेच राजकीय वर्तुळांचे लक्ष लागून आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वच पक्षाची प्रचार यंत्रणा ठप्प होऊन दैनंदिन सर्वसामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

या निर्णयापूर्वी प्रचाराच्या लाऊड स्पीकर लावलेल्या गाड्या, प्रचार करणारे कार्यकर्ते अशी रेलचेल प्रचाराचा धडाका सुरू होता. मात्र, हा धक्कादायकाने निकाल देतात सर्वत्र पक्षांच्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला आहे. सर्व प्रचार यंत्रणात ठप्प होऊन सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निवळले आहे. मात्र नवीन निवडणुकीचा वेळापत्रक अद्याप पर्यंत जाहीर झाले नाही. परंतु राज्य निवडणूक आयोगाने चार डिसेंबर पासून ते २० डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी असे सुधारित निवडणूक कार्यक्रमांमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे २ डिसेंबरला होणारे मतदान आणि ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी ही आता लांबणीवर गेली आहे.