Local Crime Branch : नगर : पारनेर तालुक्यातील माळकूप परिसरात वृद्ध महिलेस धमकी (Threats) देऊन घरफोडी (Burglary) करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून ६२ हजार ९५६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?
आरोपी हा नेप्ती नाका परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती
याबाबत गणेश रमेश काकडे (वय. ३०, रा. पेठ आंबेगाव, ता. मंचर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पुढील तपासासाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील माळकूप परिसरात घरफोडी करणारा संशयित आरोपी हा अहिल्यानगर तालुक्यातील नेप्ती नाका परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्याचे साथीदार अक्षय अर्पण भोसले, गंड्या अर्पण भोसले (दोघे रा. घाणेगाव ता. पारनेर), (दोघे पसार), यांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे
आरोपी हा सराईत गुन्हेगार (Local Crime Branch)
यातील संशयित आरोपी गणेश काकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याने खेड, चाकण, मंचर, पारनेर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.



