Shirdi Municipal Council Elections : नगर : शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचे (Shirdi Municipal Council Elections) मतदान मंगळवारी (ता. २) होत असल्याने त्याच दिवशी भरत असलेला आठवडे बाजार (Weekly Market) बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. मतदानाच्या (Voting) दिवशी बाजारामुळे वाहनांची व नागरिकांची अतिरिक्त गर्दी होऊन मतदान प्रक्रियेला अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?
शिर्डी गावातील आठवडे बाजार मंगळवारी बंद (Shirdi Municipal Council Elections)
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार शिर्डीत (ता. २) डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याच दिवशी शिर्डी नगरपरिषद हद्दीत आठवडे बाजार भरत असल्याने संभाव्य गर्दीचा धोका लक्षात घेऊन मार्केट अँड फेअर ॲक्ट नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी राहाता तालुक्यातील शिर्डी गावातील आठवडे बाजार मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय जारी केला आहे.
नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे



