Angar Nagarpanchayat Election:अखेर अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश

0
Angar Nagarpanchayat Election:अखेर अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश
Angar Nagarpanchayat Election:अखेर अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश

नगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेची निवडणूक(Angar Nagarpanchayat Election) चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र आता अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला स्थगिती (Election postponed) देण्यात आली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबद आदेश जारी केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

नक्की वाचा: जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?

सोलापूर जिल्ह्यातील ६ नगरपालिकांमधील निवडणूक स्थगित (Angar Nagarpanchayat Election)

अनगर निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या आणि ज्यांच्या उमेदवारीने वाद निर्माण झाला त्या उज्ज्वला थिटे यांनी निवडणूक स्थगितीवर प्रतिक्रिया दिली. तसेच, अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोलापूर सत्र न्यायालयाने आमचा अर्ज फेटाळला असला तरी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. तोपर्यंत निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६ नगरपालिकांमधील विविध प्रभागातील निवडणुकाही स्थगित झाल्या आहेत.

अवश्य वाचा: रोमँटिक आणि रहस्याची सांगड असलेला ‘कैरी’चा ट्रेलर प्रदर्शित   

‘निवडणुकीला मिळालेल्या स्थगितीमुळे आनंदच’ (Angar Nagarpanchayat Election)

अनगर नगरपंचायत निवडणुकीला जी स्थगिती मिळाली त्याचा आनंदच म्हणावा लागेल. मला वाटतं नियतीचे फासे फिरलेत, पाटील परिवाराने किती वेळा आनंद साजरा करायचं हे त्यांनीच ठरवावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या उज्ज्वला थिटे यांनी लगावला. मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडथळे आले, तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज बाद झाला. कोर्टात देखील माझ्या विरोधात निकाल गेला,अधिकृत निकालाची प्रत आज संध्याकाळी मला मिळेल. त्यानंतर, आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उज्ज्वला थिटे यांनी दिली. तसेच, जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निवडणुकीला स्थगिती राहावी,अशी मागणी मी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.