NCP : नगर : आगामी महापालिका निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Elections) पार्श्वभूमीवर अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रभागातील विकास कामांना गती देण्यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योजक बाबासाहेब नागरगोजे (Babasaheb Nagargoje) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार आहेत.
अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?
प्रभागाच्या सर्व प्रश्नांवर ठामपणे काम करण्याची भूमिका
शिवसेनेबाबत कोणतीही नाराजी नसून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लवकरच घड्याळ हाती घेणार आहेत. स्व. अरुण जगताप यांच्याशी असलेल्या कौटुंबिक स्नेह संबंधांचा उल्लेख करत नागरगोजे यांनी आगामी काळात प्रभागाच्या सर्व प्रश्नांवर ठामपणे काम करण्याची भूमिका जाहीर केली. या बैठकीत उद्योजक अंबादास नागरगोजे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बबन कातोरे, भाऊसाहेब भोर, लहानू भोर, नवनाथ कातोरे, बाळू वाकळे, पंकज वाकळे, बहिरू वाकळे, अनिल नागरगोजे, भाऊसाहेब खेडकर, चैतन्य बडे, बाळासाहेब बडे, केशव नागरगोजे, सुनील खामनेकर, आप्पासाहेब कातोरे यांसह बोल्हेगाव–नागापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे
कुमारसिंह वाकळे म्हणाले, (NCP)
प्रभागातील विकासाच्या प्रश्नांवर सर्वजण एकत्र आले असून माजी सभागृह नेते अशोक बडे यांनीही प्रभागात उत्तम कामे केली आहेत. आता मित्र परिवारामध्ये कोणतीही अडचण शिल्लक नसून येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ चिन्ह) या चिन्हावर विजय मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रभागात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक बडे म्हणाले, (NCP)
गेली २० वर्षे प्रभागात सतत सेवा करताना नागरगोजे–बडे कुटुंबाने सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग घेतल्याने नागरिकांशी घट्ट नाते तयार झाले. आता प्रभागातील सर्वजण एकत्र आल्याने विकासाला नवी दिशा मिळेल. कुमारसिंह वाकळे यांचेही प्रभागातील काम उल्लेखनीय राहिल्याचे त्यांनी नमूद केले. बाबासाहेब नागरगोजे म्हणाले, बोल्हेगाव-नागापूर परिसराचा झपाट्याने विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागातील अनेक प्रश्नांना समाधानकारक तोडगा काढता येईल, यावर पूर्ण विश्वास असल्याने लवकरच अधिकृतरीत्या प्रवेश केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



