
Ahilyanagar Gaurav Geet : नगर : ‘जयजयकार करू अहिल्यादेवीचा… जयजयकार करू अहिल्यानगरीचा…’ या गीतास अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत गौरव गीत (Ahilyanagar Gaurav Geet) म्हणून मान्यता द्यावी. ‘माझा जिल्हा, माझा अभिमान’ ही भावना सर्व नागरिक, युवक व लहान विद्यार्थी यांच्यात रुजून वृद्धींगत व्हावी यासाठी हे गीत जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापने (Government Establishment), सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये वाजवण्यात यावे, या मागणीचे निवेदन अहिल्यानगर गौरव गीत समितीचे गौतम मुनोत व विचार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांना दिले.
अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?
निवेदनात म्हटले की,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विचार भारतीच्या संकल्पनेतून हे गौरव गीत गौतम मुनोत प्रोडक्शनच्या माध्यमातून व स्थानिक कलाकारांना संधी देत निर्मित केले होते. या गौरव गीतात शहराचा व जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास, परंपरा, विकास व नागरिकांचा आत्मगौरव यांचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. या गीतामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नगर जिल्ह्यप्रती अभिमान व प्रेरणा निर्माण होत आहे. या गीतास सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या गीतास जिल्ह्याचे अधिकृत गौरव गीत म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे.
नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे
मागणीस सकारात्मक प्रतिसाद (Ahilyanagar Gaurav Geet)
यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी हे गौरव गीत चौंडी येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाजवण्यात आले असल्याचे सांगून या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, सरचिटणीस अशोक गायकवाड, उद्योजक राजेश भंडारी, विचार भारतीचे सुधीर लांडगे, विशारद पेटकर, सुनील नागोरी, डॉ विक्रम दिडवाणीय व निर्मल मुथा आदी उपस्थित होते.


