V. Shantaram Movie: सिद्धांत चतुर्वेदी साकारणार ‘व्ही. शांताराम’ यांची भूमिका;चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

0
V. Shantaram Movie:सिद्धांत चतुर्वेदी साकारणार ‘व्ही. शांताराम’ यांची भूमिका;चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 
V. Shantaram Movie:सिद्धांत चतुर्वेदी साकारणार ‘व्ही. शांताराम’ यांची भूमिका;चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

नगर : भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम(V. Shantaram). आता या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी जीवन आता पहिल्यांदाच एका भव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून (V. Shantaram Movie) उलगडणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित (Poster Release) झाले असून सोशल मिडियावर या पोस्टरने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

अभिजित देशपांडे करणार चित्रपटाचे दिग्दर्शन  (V. Shantaram Movie)

स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा व्ही. शांताराम यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम व्ही शांताराम चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे.

 नक्की वाचा:   रोमँटिक आणि रहस्याची सांगड असलेला ‘कैरी’चा ट्रेलर प्रदर्शित   

दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे म्हणतात,‘ व्ही. शांताराम हे नाव उच्चारताना केवळ एका व्यक्तीची चर्चा होत नाही, तर भारतीय चित्रपटाची संपूर्ण तत्त्वज्ञानपर परंपरा डोळ्यांसमोर उभी राहाते. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची निष्ठा, प्रयोगांची भीती न बाळगता कलाप्रवाहात झेप घेण्याची त्यांची हिंमत  हे सर्व पडद्यावर साकारताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली. या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हाच माझा प्रयत्न आहे.

अवश्य वाचा: डिजिटल अरेस्ट फसवणुकीची देशव्यापी चौकशी सुरू करा;सर्वोच्च नायालयाचा निर्णय  

नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी चित्रपटाची पर्वणी  (V. Shantaram Movie)

राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स ॲण्ड रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे निर्माते आहेत. येत्या नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.