Theft : नगर : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar City) व परिसरात चोऱ्या, घरफोड्या यांचे सत्र सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विशेषतः सावेडी उपनगर परिसरात चोऱ्यांचे (Theft) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सावेडी उपनगरात चोरट्यांनी (Thief) एकाच रात्री ४ ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. यामध्ये दोन मेडिकल दुकाने, एक किराणा दुकान व एका बांधकाम व्यावसायिकाचे ऑफिस फोडून रोख रक्कम लंपास केली.
अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?
पहाटेच्या सुमारास झाल्या चोऱ्या
पाईपलाइन रोडवरील भिस्तबाग चौक आणि तपोवन रोड वरील हिंदुत्व चौक परिसरात पहाटेच्या सुमारास या चोऱ्या झाल्या. दोन्ही ठिकाणी दोन चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. ही घटना तपोवन रोडवरील हिंदुत्व चौक परिसरात घडली. या ठिकाणी पहाटे ३ च्या सुमारास चोरट्यांनी १ किराणा दुकान व एका बांधकाम व्यावसायिकाचे ऑफिस फोडले. तर पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक परिसरात असलेले ऋषिकेश गांगर्डे यांचे पाटील मेडिकल या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत दुकानातील काऊंटरच्या ड्रॉवरमधील २२ ते २३ हजारांची रोकड चोरून नेली.
नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे
दोन्ही ठिकाणचे चोरटे एकच (Theft)
सकाळी या चोरीच्या घटना समोर आल्यावर तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकाला बोलावण्यात आले. पण ते मेडिकल दुकानाभोवतीच घुटमळले. ठसे तज्ञांच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दोन्ही ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे चोरी करताना दिसत असून, दोन्ही ठिकाणचे चोरटे तेच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले. पोलिसांनी हे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सावेडी उपनगरात एकाच रात्रीत काही अंतराने ४ ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिक, व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



