Nagarparishad Election Result : राज्यातील नगरपालिका, नगर परिषद (Nagarpalika and Nagarparishad Election) निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीविषयी नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) मोठा निर्णय (Big Dicision) दिला आहे. त्यानुसार उद्या मतमोजणी (Counting of votes) होणार नाही तसेच निकाल २१ डिसेंबरला (December 21) जाहीर होणार आहे.
नक्की वाचा: डिजिटल अरेस्ट फसवणुकीची देशव्यापी चौकशी सुरू करा;सर्वोच्च नायालयाचा निर्णय
२१ डिसेंबरला जाहीर होणार निकाल (Nagarparishad Election Result)
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आज महत्त्वाचा टप्पा पार पडत आहे. कारण राज्यभरातील २६२ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आता या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचा निकाल २१ तारखेला जाहीर करा. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही २०डिसेंबर पर्यंत लागू राहील,असे न्यायालयाने सांगितले.
अवश्य वाचा: अखेर अनगरची निवडणूक स्थगित, निवडणूक आयोगाचे निर्देश
आता निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे काय परिणाम होणार ? (Nagarparishad Election Result)
* नगरपरिषद आणि नागरपंचायतीचा निकाल पुढे ढकलल्यानंतर प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र २१ नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागतील.
* ही निवडणूक जवळपास २८० ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास २८० पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम २१ नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागेल.
* शिवाय सर्व स्ट्रॉंग रूममध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल.
* स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते..ती प्रक्रिया रोज २१ नोव्हेंबर पर्यंत पार पाडावी लागेल.
* विधानसभेला साधारणपणे २८८ ठिकाणी मतमोजणी असते, जवळपास तेवढेच मतमोजणी ठिकाण नगर परिषद निवडणुकीत आहेत.मात्र,लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी वोटिंग नंतर लगेच एक किंवा दोन दिवसात होते.
हे सगळे परिणाम नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल पुढे ढकलल्याने होणार आहेत.



