Short Circuit : बुरुड गल्लीत शॉर्टसर्किटमुळे दुमजली इमारतीला आग

Short Circuit : बुरुड गल्लीत शॉर्टसर्किटमुळे दुमजली इमारतीला आग

0
Short Circuit : बुरुड गल्लीत शॉर्टसर्किटमुळे दुमजली इमारतीला आग
Short Circuit : बुरुड गल्लीत शॉर्टसर्किटमुळे दुमजली इमारतीला आग

Short Circuit : नगर : अहिल्यानगर शहरातील बुरूडगल्ली परिसरात आज (ता. २) पहाटे शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) अचानक इमारतीला आग (Building Fire) लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती कळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या (Fire Fighting Department) पथकाने आग आटोक्यात आणली.

अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?

लाकडी खनाची इमारत असल्याने आगीचे रौद्ररूप

अहिल्यानगर शहरातील येथील बुरूड गल्लीत चंगेडिया यांची दुमजली इमारत आहे. या इमारतीला आज पहाटे अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही इमारत लाकडी खनाची असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.

नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे

आगीत मोठे आर्थीक नुकसान (Short Circuit)

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यात शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत मोठे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. ही आग अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमनचे वाहन चालक शुभम गावडे, सिंधू भांगरे, फायरमन अशोक चितळे, मच्छिंद्र चितळे, सागर जाधव, करण राठोड, ऋषिकेश घोंगडे, विठ्ठल चितळकर यांच्या पथकाने आटोक्यात आणली.