Nylon China Manja : नायलॉन मांजा विक्री करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nylon China Manja : नायलॉन मांजा विक्री करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Nylon China Manja : नायलॉन मांजा विक्री करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Nylon China Manja : नायलॉन मांजा विक्री करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nylon China Manja : नगर : केडगाव उपनगरातील नायलॉन चायना मांजा (Nylon China Manja) विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा एका संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : जातीने केला प्रेमाचा अंत! प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न,नेमकं काय घडलं ?

खात्रीशीर माहितीनुसार कारवाई

विशाल कुमार दळवी (वय. ३०, रा. आरती रो हाऊसिंग भुषणनगर केडगाव, ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव उपनगरातील भूषणनगर परिसरात विक्रीस बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

नक्की वाचा : वन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देणार शस्र हाताळण्याचे प्रशिक्षण: सोमनाथ घार्गे

१ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Nylon China Manja)

त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किंमतीची ११० नग प्लास्टिक नायलॉन मांजा, व ७५ हजार रुपयांची एक दुचाकी असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुनील पवार, संतोष खैरे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांच्या पथकाने केली.