नगर : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची हत्या झाली असती पण ते वाचले असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी केले आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये खून (Murder) होणार होता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांच्यामुळे ते वाचले,असं त्यांनी भाषणात म्हटलं आहे.
धनंजय मुंडे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी गंगाखेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर कडाडून टीका केली होती. आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर सोळाशे कोटी रुपयांचे कर्ज उचलले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांना केली होता. याला आता आमदार गुट्टे यांनी उत्तर दिले आहे.
नक्की वाचा: उद्याची मतमोजणी रद्द;हायकोर्टाचा मोठा निर्णय,आता परिणाम काय होणार ?
आमदार गुट्टे यांचे मुंडेंना प्रत्युत्तर (Dhananjay Munde)
गंगाखेडमधील भाषणात बोलताना आमदार गुट्टे म्हणाले की, ‘तुम्ही सुरुवात केली आहे, पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे. त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो. मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनू भाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.
अवश्य वाचा: डिजिटल अरेस्ट फसवणुकीची देशव्यापी चौकशी सुरू करा;सर्वोच्च नायालयाचा निर्णय
‘धनंजय मुंडे तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता,पण… (Dhananjay Munde)
रत्नाकर गुट्टे यांनी एक खळबळजनक खुलासा करत म्हटलं आहे की, ‘धनंजय मुंडे तुमचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं. तुम्ही कोणत्या हॉटेलवर होते याची देखील मला माहिती आहे, पण मी सगळेच आता काढणार नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे. आमदार गुट्टे यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.



