
नगर : देशातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण आता तुमच्या मोबाईलमध्ये संचार साथी (Sanchar Saathi App) हे अॅप्लिकेशन बाय डिफॉल्ट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अॅप्लिकेशनला तुम्हाला अनइन्स्टॉल (UnInstall) करता येणार नाही. आता सरकारने हा निर्णय नेमका का घेतला ? याची माहिती जाणून घेऊयात…
सायबर घोटाळे थांबणार? (Sanchar Saathi App)
भारतामध्ये दिवसेंदिवस सायबर घोटाळ्यांमध्ये वाढ होत आहे. हेच रोखण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये त्यांच्यासाठी हे ॲप्लिकेशन टाकण्यात येणार आहे. वापरकर्त्यांना हे ॲप्लिकेशन डिलीट करता येणार नाही.
नक्की वाचा: उद्याची मतमोजणी रद्द;हायकोर्टाचा मोठा निर्णय,आता परिणाम काय होणार ?
सगळ्या फोनमध्ये असणार इंस्टॉल (Sanchar Saathi App)

आता बाजारात नवीन येणाऱ्या सर्व फोनमध्ये हे ॲप्लिकेशन सुरुवातीपासूनच असेल. यासोबत जुन्या सर्व स्मार्टफोनमध्ये देखील अपडेटद्वारे सुरक्षिततेसाठी हे ॲप्लिकेशन टाकण्यात येणार आहे. सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी ९० दिवसाच्या आत सर्व स्मार्टफोन कंपन्यांना करावी लागणार आहे. हा नियम ॲपल, सॅमसंग, विवो, शाओमी,गुगल आणि इतर कंपन्यांसाठीही लागू करण्यात आला आहे. संवादासाठी हे ॲप पहिल्या वापरात स्पष्टपणे दिसावे आणि त्याच्या फीचर्समध्ये कंपन्यांनी अडथळा आणू नये, असे देखील सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
अवश्य वाचा: धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले; रासप आमदाराच्या दाव्याने खळबळ
चोरीला गेलेले फोन शोधण्यात मदत होणार (Sanchar Saathi App)
मिळालेल्या माहितीनुसार, संचारसाथी या ॲप्लिकेशनमुळे सायबर सुरक्षेत वाढ होईल. हे ॲप IMEI नंबर द्वारे हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन शोधून देण्यास मदत करते. देशभरात या ॲपने कोट्यवधी लोकांच्या मोबाईलचा डेटा चोरी होण्यापासून वाचवले आहे. तसेच त्यांची होणारी फसवणूक टाळली आहे. यामुळे लाखो फोन ब्लॉक करण्यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणात चोरी झालेले मोबाईल सापडण्यास आणि हस्तगत करण्यास या नवीन ॲपमुळे यश आले आहे. फसवणूक करणाऱ्या बीपीओ सेंटरर्सचा तपास सुद्धा या नवीन ॲपमुळे लागला आहे. हे ॲप मोठ्या प्रमाणात इन्स्टॉल करण्यात येत आहे. तर याची विश्वासाहर्ता आणि लोकप्रियता वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे ॲप बाय डिफॉल्ट इन्स्टॉल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


