Minor Girl Sexually Assaulted : नगर : अहिल्यानगर येथील एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार (Minor Girl Sexually Assaulted) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत संशयित युवकावर तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) फिर्यादीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान
इंस्टाग्रामवरून संशयित आरोपीसोबत ओळख
पीडित मुलगी ही अहिल्यानगर येथील एका शाळेत शिक्षण घेते. इंस्टाग्रामवरून तिची संशयित आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने मुलीच्या शाळेजवळ येऊन तिचा पाठलाग करणे सुरू केले. १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी मुलीला थांबवून आरोपीने तिचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यावर आरोपीने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर त्याने मुलीला अनेक वेळा शाळा सुटल्यावर धमकावून आपल्या दुचाकीवरून घेऊन जात होता. तपोवन रस्ता परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
पीडितेला व तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी (Minor Girl Sexually Assaulted)
२७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलीचे पेपर सुरू असताना, तिला पुन्हा धमकी देऊन सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या एका घरी नेले. तेथे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. विरोध केल्यावर तिला मारहाणही केली. यानंतर २८ आणि २९ ऑक्टोबर तसेच २१ आणि २४ नोव्हेंबर या दिवशीही आरोपीने मुलीला धमकावून याच ठिकाणी नेऊन अत्याचार केले. आरोपीने पीडितेला आणि तिच्या पालकांना गायब करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संपूर्ण प्रकारानंतर अल्पवयीन पीडितेने धाडस करून आईच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



